बीड – शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्ण आणि नातेवाईक तडफडत आहेत मात्र दुसरीकडे खाजगी हॉस्पिटलमध्ये आणि मेडिकल वर रुग्णांची लूट केली जात आहे .शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये असलेल्या मेडिकल वर हे इंजेक्शन 5400 रुपयांना विक्री केले जात असताना रुग्णांच्या नातेवाईकांनी पडकले .या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी प्रकरण चौकशी वर ठेवले आहे .तर अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील औषध निरीक्षक डोईफोडे हे पोलीस ठाण्यात काहीवेळ थांबून नंतर तेथून निघून गेले .
राज्यात रेमडिसिव्हीर इंजेक्शन चा तुटवडा निर्माण झालेला असताना काही लोक या इंजेक्शन चा काळाबाजार करत आहेत .कोविड केयर सेंटर असलेल्या हॉस्पिटलमध्ये जी मेडिकल आहेत त्यांना हे इंजेक्शन विक्रीची ते ही एम आर पी ऐवजी किमान 1400 रुपयांना विक्री करण्याचे आदेश आहेत .
बीड जिल्ह्यात या इंजेक्शन चा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत .या तक्रारी कमी व्हाव्यात म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी टास्क फोर्स ची स्थापना केली आहे .मात्र तरीही काही लोक काळाबाजार करीत आहेत .
बीड शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये असलेल्या मेडिकल वर हे इंजेक्शन 5400 रुपयांना विक्री होत असताना रुग्णाच्या नातेवाईकांनी रंगेहाथ पकडले .त्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टर, मेडिकल चालक,तक्रारदार यांनी गर्दी केली होती .
लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये हा जो प्रकार झाला आहे तो गंभीर आहे .या प्रकरणाची जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन संबंधित मेडिकल आणि हॉस्पिटल कडक कारवाई करणे आवश्यक आहे .
दरम्यान आपल्याकडे प्राप्त झालेल्या 220 इंजेक्शन ची विक्री आपण खरेदी किंमती नुसार केली आहे,हा प्रकार अनावधानाने झाल्याची माहिती मेडिकल चालकाने दिली आहे .