नवी दिल्ली – मेडीकल फिल्डमध्ये पुढील उच्च शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी दोनवेळा नॅशनल एलिजीबिलीटी टेस्ट आयोजित केली जाते. नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन ने 14 एप्रिल रोजी नीट पीजी 2021 परिक्षेचे ऍटमिट कार्ड जाहीर केले आहेत. ही परीक्षा 18 एप्रिल 2021 रोजी होणार होती. मात्र आता ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
याबाबतची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. त्यांनी म्हटलंय की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नीट पीजीची 18 एप्रिल रोजी होणारी प्रस्तावित प्रवेश परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. कोरोना व्हायरस महासंकटाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या संसर्गामुळे मेडीकलचे विद्यार्थी सोशल मीडियातून या परिक्षेला विरोध करत होते. तर काही विद्यार्थी या परिक्षेच्या आयोजनाविरोधात PIL दाखल करण्याच्या तयारीत देखील होते. या परीक्षेमध्ये जवळपास 2 लाखाहून अधिक मेडीकल विद्यार्थी सहभागी होणार होते.