बीड – जिल्ह्यातील कोरोनाचा एक हजाराच्या घरात असलेला आकडा कमी होत नसल्याचे चित्र आहे,गुरुवारी देखील तब्बल 963 रुग्ण आढळून आले असून यात सर्वाधिक रुग्ण हे अडीचशे च्या घरात अंबाजोगाई तालुक्यातील असून केज,बीड आणि आष्टीतील आकडेवारी शंभरी पार गेली आहे . रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील रुग्णालयांमधील बेड कमी पडत असल्याचे चित्र आहे .
बीड जिल्ह्यातील 3799 रुग्णांची तपासणी केली असता 963 पॉझिटिव्ह आढळले आहेत .यात अंबाजोगाई – 230,आष्टी 116,बीड 167,धारूर 25,गेवराई 49,केज 106,माजलगाव 70,परळी 69,पाटोदा 59,शिरूर 43 आणि वडवणी मध्ये 29 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून एक हजार च्या घरात रुग्णसंख्या आढळत आहे,दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील पाचशे च्या घरात आहे,मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात देखील सहजासहजी बेड उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे .