बीड – राज्य सरकारने जाहीर केलेले कडक निर्बंध आणि संचारबंदी बीड जिल्ह्यात लागू आहे की नाही अशी शंका यावी असे चित्र 15 तारखेला दिसून आले .बीड करांनी मुक्त संचार करत संचारबंदी ला हरताळ फासल्याच चित्र स्पष्टपणे दिसलं .ना पोलीस अडवत होते ना लोक घरात बसून होते .
राज्यात वाढते कोरोना रुग्ण पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिलच्या रात्री आठ वाजेपासून कडक निर्बंध लावताना दिवसा फिरण्यावर संचारबंदी लावली तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते .
मात्र बीडमध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत फेरफटका मारला असता लॉक डाऊन किंवा संचारबंदी असल्याचं चित्र कुठेही दिसून आले नाही .शहरातील स्वीट होम,किराणा दुकान,भाजी पाल्याची दुकानं सुरु होती,लोक दुचाकीवर बिनधास्त शहरभर फिरत असल्याचं चित्र दिसून आलं .
कोणत्याही प्रकारचे निर्बंध बीडकर पाळत नव्हते .दुकानावर गिऱ्हाईक नसले तरी रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या मात्र मोठी होती,माळीवेस चौक,शिवाजी चौक ,बार्शी नाका चौक वगळता कुठेही पोलीस दिसले नाहीत,होते ते सुद्धा सावलीत बसून मोबाईल खेळत होते .
एकंदर परिस्थिती पाहता ऑल क्लोज बट एव्हरीथिंग ओपन अस वास्तव चित्र होत .अशाने परिस्थिती नियंत्रणात कशी येणार हा प्रश्नच आहे .प्रशासनाने कितीही निर्बंध लावले तरी हम नही सुधरेंगे असच जणू बिडकरांनी ठरवलं आहे ,त्यामुळे कोरोना कितीही नको म्हणला तरी शहर आणि जिल्हा वासीय मात्र त्याला आयतं निमंत्रण देत आहेत हे नक्की .