मुंबई – सध्या सुरू असलेली कोरोनाची दुसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असून त्यांना जर काही लक्षण दिसंत असतील तर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या अस तज्ज्ञांनी म्हटलं आहे .विशेषतः सर्दी पडसे,ताप,अंगावर पुरळ येत असेल तर तातडीने तपासणी करून घ्या अस सांगण्यात आलं आहे .
सुभाष राव सांगतात, “कोरोनाची दुसरी लाटेत पूर्णपणे उलट ट्रेंड दिसून येत आहे. गेल्यावर्षी, लहान मुलांना कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत. त्याचवेळी, यावर्षी कोरोनाच्या दुसर्या लाटेत, प्रथम लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत आणि संसर्ग लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत पसरत आहे. म्हणूनच जर आपल्याला ही लक्षणे मुलांमध्ये दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
-ताप,सर्दी पडसे,कोरडा खोकला, लूज मोशन (जुलाब),उल्टी येणे,भूक न लागणे,जेवण योग्य प्रमाणात न घेणे,थकवा जाणवणे,शरीरावर पुरळ उठणे,श्वास घेताना अडचण किंवा त्रास होणे ही लक्षणे मोठ्या प्रमाणात मुलांमध्ये आढळून येत आहेत,तुमच्या मुलांना यातील काही लक्षण दिसत असतील तर तातडीने तपासणी करून वैद्यकीय सल्ला घ्या अस म्हटलं आहे .
डॉ. राव सांगतात लहान मुलाला कोविड-19 इंफेक्शन अर्थात संसर्गाची लक्षणे दिसल्यास दुसर्या दिवशी लगेचच आरटी-पीसीआर चाचणी करुन घ्या. चाचणी करुन घेण्यात उशीर करु नका. उपचार लवकर सुरु करणे महत्वाचे आहे. हे लक्षात ठेवा की मुले सुपरप्रेडर होऊ शकतात, म्हणजेच ते इतर मुलांना आणि प्रौढांना वेगाने संक्रमित करु शकतात. त्यामुळे पालकांनी योग्य ती काळजी घ्यावी.