नवी दिल्ली – केंद्रीय बोर्ड अर्थात सिबीएससी च्या दहावी आणि बारावीच्या मे मध्ये होणाऱ्या परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या संदर्भात 12 वाजता बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सीबीएसईचे सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर, दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
4 मे ते 14 जून दरम्यान बारावीच्या आणि 4 मे ते 7 जून दरम्यान सिबीएससी च्या परीक्षा होणार होत्या मात्र आता रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे .कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर या परीक्षा होतील अशी सूत्रांची माहिती आहे.