मुंबई – कोरोनाचा वाढत असलेला उद्रेक कमी करण्यासाठी अखेर उद्या रात्री आठ वाजेपासून ते 30 एप्रिलपर्यंत म्हणजे 14 दिवसांचा लॉक डाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला,मेडिकल वगळता किराणा आणि दुग्धजन्य पदार्थाची दुकानं ठराविक वेळेत सुरु असतील मात्र लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे .यातून पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत सूट दिली आहे .
कडक निर्बंध काय असतील
ब्रेक द चेन
राज्यात 144 कलम लागू किमान पंधरा दिवस,अतिआवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही,सर्व आस्थापना बंद राहतील,सकाळी सात ते रात्री आठ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील,लोकल,रेल्वे सुरू राहतील,जीवनावश्यक सेवा देणाऱ्यांची या सेवा सुरू राहतील, रुग्णालय,मेडिकल,वाहतूक,लस उत्पादक कारखाने,मास्क,वैद्यकीय कच्चा माल,जनावरे वाहतूक, दवाखाने,वेअर हाऊस, राजनैतिक कार्यालये,पावसाळ्याची कामे ,पूर्वीची कामे,बँक,सेबी कार्यालये,इ कॉमर्स,अधिस्वीकृती धारक पत्रकार,यांना सवलत .बांधकाम,उद्योग यांना अटी आणि शर्थीवर सूट,अनावश्यक ये जा करता येणार नाही,हॉटेल्स, रेस्टॉरंट पार्सल सुविधा,रस्त्यावरील खाद्य विक्रेते यांना पार्सल साठी सूट,गर्दी टाळणे आवश्यक,
मोफत धान्य देणार,सात कोटी लोकांना रेशनवर धान्य देणार,प्रत्येकी तीन किलो गहू,दोन किलो तांदूळ देणार,महिनाभर मोफत शिवभोजन थाळी देणार, संजय गांधी निराधार व इतर योजनांचे पैसे दोन महिन्यासाठी एक हजार रुपये आर्थिक सहाय्य अगोदर देणार,नोंदणी कृत बांधकाम कामगारांना 1500 रुपये 12 लाख कामगारांना देणार,घरेलू कामगारांना निधी देणार,अधिकृत फेरीवाले यांना 1500 रुपये देणार,रिक्षा चालक परवानाधारक याना 1500 रुपये महिनाभर देणार,आदिवासी साठी खवटी अंतर्गत 1200 रुपये देणार,
कोविड वरील उपाययोजना साठी जिल्हाधिकारी यांना 3300 कोटी रुपये देणार,पाच हजार चारशे कोटींची तरतूद या सगळ्यासाठी करण्यात आली आहे .
राज्यात दररोज मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन चा वापर होतो आहे,त्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्यास केंद्राने परवानगी दिली आहे .राज्यातील आरोग्य सुविधा वाढल्या असल्या तरी ताण वाढतो आहे .हवाई वाहतुकीच्या माध्यमातून ऑक्सिजन आणण्याची मागणी केंद्राकडे करणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली .
जीएसटी ची मुदत तीन महिने वाढवण्याची विनंती केंद्राला करणार आहे तसेच नैसर्गिक आपत्ती म्हणून कोरोनाचा समावेश करून व्यक्तिगत मदत लोकांना केंद्राने करावी .लसीकरण लवकर व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत,त्याचा वेग वाढवतो आहोत .
निवृत्त झालेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी पुढे यावे,सेवाभावी संस्था,व्यक्ती,सामाजिक संघटना यांनी पुढाकार घ्यावा .उनीदुणी काढू नका,राजकारण बाजूला ठेवा अशी विनंती ठाकरे यांनी केली .