November 28, 2021

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा कारवाईला सामोरे जा – धनंजय मुंडे !

बीड – कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने गांभीर्याने काम करावे,रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजन बेड,व्हेंटिलेटर,रेमडिसिव्हीर कमी पडणार नाही यासाठी प्रयत्न करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा निर्वाणीचा ईशारा दिला असल्याची माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली .बीड जिल्ह्यात एक हजार ऑक्सिजन बेड दोन दिवसात उपलब्ध करून दिले अशी माहिती त्यांनी दिली .

जिल्ह्यातील जनतेला हात जोडून विनंती करताना मुंडे यांनी नियम पाळा अन प्रशासनाला सहकार्य करा असे म्हटले .पुन्हा लॉक डाऊन च संकट आहे त्यामुळे कोविड चे नियम पाळा असे म्हटले आहे .14 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करावी असे आवाहन त्यांनी केले .

रक्त पुरवठ्याच संकट आहे त्यासाठी एनजीओ आणि इतर सामाजिक संघटना यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले,15 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 3 पर्यंत महारक्तदान शिबिर घेऊन जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करत असताना आत्मनिर्भर व्हावं म्हणून अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला मात्र तांत्रिक मान्यता न मिळाल्याने तो प्लांट सुरू झाला नाही,उद्यापासून एक सुद्धा ऑक्सिजन सिलेंडर कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली .

येत्या दोन चार दिवसात 1200 अधिक टेस्ट करण्यासाठी नव्या मशनरी खरेदीसाठी निधी दिला असून टेस्ट वाढतील असे त्यांनी म्हटले तसेच बीड जिल्हा रुग्णालयामार्फत देखील बीड ला नव्याने प्रयोगशाळा मंजूर करण्यासाठी प्रस्ताव पाठवून लवकर ती सुरू केली जाईल असे मुंडे यांनी म्हटले .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *