बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा तब्बल तीनशे ने कमी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले .4858 रुग्णांची तपासणी केली असता 732 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रविवारी द्विशतक करणाऱ्या अंबाजोगाई ने आजही आपला स्कोर कायम ठेवला आहे,बीड चा स्कोर मात्र शंभर ने कमी झाला आहे .
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात पाचशे पेक्षा जास्त रुग्ण एकाच दिवसात आढळून येत असल्याची स्थिती आहे,रविवारी तर हा आकडा तब्बल एक हजाराच्या घरात गेला होता,त्यामुळे सोमवारी आकड्यात वाढ होईल असे वाटत असताना हा आकडा तब्बल तीनशे ने कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे .
सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात अंबाजोगाई 239,आष्टी 90,बीड 112,धारूर 10,गेवराई 25,केज 55,माजलगाव 19,परळी 68,पाटोदा 12,शिरूर 62आणि वडवणी मध्ये 11रुग्ण आढळून आले आहेत .