नवी दिल्ली – देशात गेल्या महिनाभरात कोरोना बाधितांचा वेग झपाट्याने वाढतो आहे,हेच प्रमाण जागतिक पातळीवर देखील वाढले आहे,याला कारणीभूत विंडो पिरियड असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे .कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना संक्रमण अथवा लक्षणे आढळून येण्याचा कालावधी दोन दिवस ते चौदा दिवस इतका वाढल्याने रुग्णांची संख्या वाढते आहे अस मत व्यक्त केलं गेलं आहे,त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे .
चीनच्या संशोधकांनी ७२ हजार ३१४ कोरोनाग्रस्त रुग्णांचा अभ्यास केला आहे. त्यात ८१ टक्के रुग्णांमध्ये कमी प्रमाणात लक्षणे अथवा लक्षणे नसल्याचे आढळले. १४ टक्क्यांमध्ये श्वसनाला त्रास होणे, फुफ्फुसापर्यंत संक्रमण २४ ते ४८ तासांत आढळले. पाच टक्क्यांमध्ये श्वसन संस्था बंद होणे आणि अनेक अवयांच्या कार्यांमध्ये अडथळे आल्याचे आढळून आले आहे.
२.३ टक्के रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे आणि मृत्यूकडे वाटचाल अशी गंभीर स्थिती निष्पन्न झाली आहे. यावरून प्रतिकारशक्ती व कोर्बिंड यावर विंडो पिरिअडची विविध स्पष्ट होत असल्याचे वैद्यकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲन्ड प्रिव्हेन्शनच्या संशोधकांनी १७० लाख जणांचा अभ्यास केला आहे. त्यात पुरुष, ज्येष्ठ आणि आर्थिकदृष्ट्या गरिबांमध्ये कोरोना संसर्ग अधिक प्रमाणात दिसून आला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यावर थंडी वाजून ताप येणे, खोकला, श्वसनाला त्रास होणे, गळणे, सर्वांग दुखणे, डोकेदुखी, घसा सुजणे, चव-वास न येणे, नाक चोंदणे, नाक वाहणे, मळमळ, उलटी, जुलाब, कफ निघणे, मानसिक ताणतणाव अशी लक्षणे आढळतात. संशोधकांच्या अभ्यासानुसारच्या विंडो पिरिअडमध्ये खेळती हवा नसताना एकत्र असण्यातील ‘थ्री-सी’ (क्लोज्ड स्पेसेस, क्रॉऊडेड स्पेसेस, क्लोज कान्टॅक्ट सेटिंग) महत्त्वाचा बनला आहे. म्हणजेच काय, तर गर्दीच्या ठिकाणी अनेकांची जवळीक, एकत्रित बसणे आणि गप्पा मारणे अथवा बैठक घेणे, बंद जागेत बराच वेळ घालवणे यातून कोरोना विषाणू संसर्ग प्रसाराची गती वाढत असल्याचे वैद्यकीय अभ्यासकांनी म्हटले आहे.