बीड – बीडच्या जिल्हा कारागृहात असलेल्या कैद्यांपैकी 28 कैदी मागील महिनाभरात कोरोना बाधित झाल्याचे समोर आले असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे,क्षमतेपेक्षा जास्त कैदी या ठिकाणी असून कोरोनाचा शिरकाव झाल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .
बीड जिल्हा कारागृहात 161 कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे मात्र सध्या या ठिकाणी 297 कैदी आहेत .काही दिवसांपूर्वी या ठिकाणी तब्बल 66 कैदी कोरोना बाधित झाले होते,तर कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता .
दरम्यान रविवारी केलेल्या तपासणीत कारागृहातील दोन कैदी पॉझिटिव्ह आले नव्हेत तर गेल्या महिनाभरात 28 कैदी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत,अद्याप काही कैद्यांची तपासणी बाकी असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे,त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे .