बीड – बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात कधीही एका दिवशी एव्हढ्यामोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली नव्हती तेवढी रविवारी उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवली गेली .बीड जिल्ह्यात 1062 रुग्ण आढळून आले,त्यात बीड,अंबाजोगाई आणि आष्टी या तीन तालुक्यांनी द्विशतक पार केले आहे .विशेष म्हणजे केज तालुक्याने देखील या स्पर्धेत भाग घेत रुग्णसंख्येचे शतक पारकेले आहे .
बीड जिल्हा वासीयांची बेफिकीर इतकी वाढली आहे की गेल्या महिना दीड महिन्यात रुग्णसंख्या शंभर दोनशे तीनशे ने वाढले आहेत .आजपर्यंत बीड जिल्ह्यात कधीही एका दिवशी एक हजार रुग्ण आढळून आले नव्हते,मात्र रविवारी हा देखील योग आला .
बीड जिल्ह्यातील 5681 रुग्णांची तपासणी केली असता तब्बल 1062 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .यात अंबाजोगाई मध्ये 223,आष्टी 193,बीड 220,धारूर 30,गेवराई 64,केज 106,माजलगाव 34,परळी 75 ,पाटोदा 53,शिरूर 45 आणि वडवणी मध्ये 19 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .