बीड – जिल्ह्यातील साडेसहा हजाराच्या आसपास रुग्णांची तपासणी केली असता त्यातील साडेपाच हजार पेक्षा जास्त रुग्ण हे निगेटिव्ह आहेत तर 764 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .बीड,आष्टी,अंबाजोगाई, केज,माजलगाव या तालुक्यात किमान पन्नास आणि जास्तीत जास्त दिडशे च्या घरात रुग्ण आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात अंबाजोगाई 143,आष्टी – 123,बीड – 141,धारूर 29,गेवराई 60,केज 71,माजलगाव 73,परळी 59,पाटोदा 25,शिरूर 26 आणि वडवणी मध्ये 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यात ज्या प्रमाणात टेस्ट वाढत आहेत त्या प्रमाणात रुग्णसंख्या देखील वाढत असून सरकारी रुग्णलायत बेडची कमतरता भासत असल्याने आता खाजगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत .