बीड – बीड जिल्ह्यात कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले होते,त्याला प्रतिसाद देत जिजाऊ प्रतिष्ठान आणि मित्र मंडळाच्या वतीने 65 जणांनी रक्तदान केले .
गेल्या तीन चार महिन्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत,त्यामुळे रक्तदान शिबिर आयोजित होत नसल्याने शासकीय आणि खाजगी रक्तपेढी मध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे .सामाजिक संघटना आणि इतरांनी या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाने केले होते .
या आवाहनाला पाठिंबा देत बंडू कदम यांचे जिजाऊ प्रतिष्ठान आणि मित्र मंडळाने हॉटेल पंचरत्न च्या परिसरात रक्तदान शिबिर आयोजित केले होते,त्याला मोठा प्रतिसाद मिळाला .तब्बल 65 जणांनी या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला .