अहमदनगर – कोरोनाचा भयाण अन भीषण चेहरा अहमदनगर वासीयांना गुरुवारी पहायला मिळाला,शहरातील अमरधाम स्मशानभूमीत 22 आणि विद्युत दाहिणीत वीस कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले .कोरोनाचा हा काळाकुट्ट चेहरा पाहून इथे ओशाळला मृत्यू अशीच भावना अनेकांनी व्यक्त केली .
राज्यात दररोज 50 हजारापेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत .विशेषतः पुणे,मुंबई,औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर,नाशिक यासारख्या मोठ्या शहरात दररोज किमान दोन ते पाच हजार रुग्ण सापडत आहेत .
अहमदनगर जिल्ह्यात दररोज किमान अडीच हजार रुग्णांची भर पडत आहे .गुरुवरचा दिवस नगर वासीयांच्या आयुष्यातील सगळ्यात धक्कादायक अन मन सुन्न करणारा होता .नगर शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तब्बल 42 रुग्णांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला .
या सगळ्या कोरोना बाधित मृतदेहांवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले .यातील 22 मृतदेहांवर अमरधाम स्मशानभूमीत तर 20 मृतदेहांवर विद्युतदाहिनी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले .