July 28, 2021

वाझे च्या लेटरबॉम्ब ने शरद पवार,अनिल देशमुख, अनिल परब यांच्यावर आरोप !

वाझे च्या लेटरबॉम्ब ने शरद पवार,अनिल देशमुख, अनिल परब यांच्यावर आरोप !

मुंबई – राज्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब मुळे गृहमंत्र्यांची विकेट जाऊन चोवीस तास उलटले तोच पुन्हा एका नव्या लेटरबॉम्ब ने खळबळ उडाली आहे .अंबानी स्फोटक प्रकरणी एन आय ए कोठडीत असलेले निलंबित एपीआय सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्या नावाने दोन कोटी मागितले तर परिवहनमंत्री अनिल परब यांनी देखील बिल्डर लोकांकडून खंडणी वसुलीचे टार्गेट दिले होते .असा आरोप वाझे ने पत्रात केल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे .

अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांनी राज्याला हादरवून टाकणारा गौप्यस्फोट केला आहे. “आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती,” असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात केला केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी वाझेंनींही ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे.

सध्या एनआयएच्या कोठडीत असलेल्या वाझे यांनी एनआयएला एक पत्र लिहिलं आहे. ज्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे.

वाझे यांनी स्वतःच्या हस्तक्षरात एनआयएला पत्र लिहिलं आहे. “२०२० मध्ये मला पोलिस दलात घेण्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. माझी नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी शरद पवारांची इच्छा होती. मात्र, आपण शरद पवारांचं मतपरिवर्तन करू, असं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला सांगितलं होतं. या कामासाठी देशमुख यांनी मला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती,” असा दावा वाझे यांनी पत्रात केला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *