April 12, 2021

अंबाजोगाई मध्ये एकाच चितेवर आठ जणांना अग्निडाग !

अंबाजोगाई मध्ये एकाच चितेवर आठ जणांना अग्निडाग !

अंबाजोगाई – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून बीड आणि अंबाजोगाई मध्ये रुग्णस7दररोज शंभरच्या पुढे जात आहे .मंगळवारी अंबाजोगाई मध्ये आठ बाधितांचा मृत्यू झाल्याने एकाच चितेवर अग्निडाग देण्यात आला .हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते .लोकहो काळजी घ्या नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल .

बीड जिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या वाढत असल्याने नव्या रुग्णांना आता अंबाजोगाई ला हलवले जात आहे .लोखंडी सावरगाव आणि एस आर टी मध्ये धारूर,अंबाजोगाई, केज येथील रुग्णांवर उपचार केले जातात .

दररोज शंभर च्या आसपास रुग्ण वाढत असल्याने आरोग्य सुविधा कमी पडत आहेत .मंगळवारी भटगल्ली,मंगरूळ,धारूर, आपेगाव,बोरखेड यासह आठ ठिकाणच्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला .या सर्व मृतदेहावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले .

हे दृश्य मनाला चटका लावणारे होते,लोकांनी काळजी न केल्यास परिस्थिती अवघड होण्याची शक्यता आहे .

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *