नवी दिल्ली – माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात खुद्द राज्य सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे .मात्र याबाबत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे .
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या याचिकेत संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआयला परवानगी दिली आहे. त्यामुळे राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख थेट दिल्लीला पोहोचले होते. अनिल देशमुख यांनी सोमवारी रात्री उशिरा ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर याचिका दाखल करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर परमबीर सिंग प्रकरणातील मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांचं सुप्रीम कोर्टात कॅव्हिएट दाखल केलं आहे.पाटील यांना सीबीआयने संपर्क साधल्याची माहिती आहे. सीबीआय पाटील यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाची आज माहिती घेणार आहे.