बीड – लॉक डाऊन च्या काळात बाहेर फिरणाऱ्या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिले जाईल असे जर आदेश सरकारने काढले तरीसुद्धा बीडचे लोक रस्त्यावर येतील कारण हत्ती किती मोठा आहे हे बघण्यासाठी, अशीच अवस्था आज दिसून आली .दुकान बंद असताना मोक्कार बीडकर रस्त्यावर बोंबलत फिरताना दिसून आले,विशेष म्हणजे कोणत्याही चौकात कोणीही या लोकांना साधं हटकल देखील नाही .
संपूर्ण राज्यात ब्रेक द चेन सुरू झाले आहे,यामध्ये राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत .वैध आणि महत्त्वाचे कारण असेल तरच बाहेर पडावे अन्यथा पाचशे रुपये दंड आणि कारवाई ला सामोरे जावे लागेल असे आदेश प्रशासनाने काढले आहेत .

अस असलं तरी बीडच्या रस्त्यावर सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली .अंबिका चौक असो की साठे चौक,अथवा शिवाजी चौक किंवा पेठ बीड,माळीवेस सगळीकडे दुचाकीवर फिरणारे दोन तीन जण दिसतच होते .ना त्यांना कोणी रोखत होते ना विचारत होते .लोक बिनधास्तपणे फिरताना दिसून आले .
बर या लोकांना विचारलं असता काही नाही सहज आलोत बीड कसकाय बंद आहे हे बघायला आलो होतोय,घरी लै बोर होतंय,घरात करमत नाही अशी कारणे अनेकांनी सांगितली .
कोणत्याच चौकात ना पोलीस होते ना अशा मुफारी, मोक्कार फिरणाऱ्या लोकांना अडवणारी यंत्रणा होती,जर काही दिवस घरात बसले तर या लोकांना कोंब फुटणार आहेत का की एका जागी बसल्याने मोड येणार आहेत,नेमकी यांची अडचण काय आहे तेच कळायला मार्ग नाही .
या अशा मोक्कार फिरणाऱ्या लोकांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा सहाशे च्या घरात गेला आहे,आता तरी काही दिवस लेकरा बाळात घरी बसावे एवढच बीड वासीयांना सांगणं आहे .