बीड – राज्य शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने जे आदेश दिले आहेत त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकान,व्यावसायिक यांच्यात संताप निर्माण झाला आहे मात्र जी दुकाने बंद आहेत त्यांनी स्वतः आणि दुकानातील कामगारांचे लसीकरण तातडीने करून घ्यावे म्हणजे ती दुकाने सुरू करण्याबाबत योग्य निर्णय घेता येईल असे म्हटले आहे .त्यामुळे दुकान सुरू करायचे तर लस घ्या असे आवाहन आहे .

राज्यात पाच एप्रिल रात्री बारा वाजेपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद असतील असे म्हटले आहे,त्यामुळे अनेक लोक कन्फ्युज झाले आहेत .मात्र शासनाचे आदेश नीट वाचले तर त्यात एक गोष्ट स्पष्ट आहे की जी दुकाने बंद आहेत,त्यांनी त्यांच्यासाहित दुकानात काम करणाऱ्या लोकांचे लसीकरण करून घ्यावे जेणेकरून ती दुकाने सुरू करण्याबाबत निर्णय घेता येईल असे म्हटले आहे .
आता याबाबत सुद्धा कन्फ्युजन आहे कि,शासन एकीकडे 45 वर्षावरील लोकांनी लसीकरण करून घ्यावे असे म्हणते मग ज्या दुकानात कामगारांचे वय 45 च्या खाली आहे त्यांचे लसीकरण कसे करून घ्यावे याबाबत कोणतेही स्पष्टपणे निर्देश नाहीत त्यामुळे नेमकं काय करावं असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे .