मुंबई – परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब मुळे राजीनामा द्यावा लागलेल्या अनिल देशमुख यांच्याकडील गृहमंत्री पदाचा पदभार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आला असून पाटील यांच्याकडील कामगार खाते हसन मुश्रीफ यांना तर उत्पादन शुल्क खाते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे .
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या वसुलीच्या आरोपाबाबत जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हाय कोर्टाने सीबीआय कडे चौकशी दिली होती .त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला .
त्यानंतर राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पद दिले जात असल्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल यांच्याकडे दिले तसेच अनिल देशमुख यांचा राजीनामा देखील दिला,त्याचप्रमाणे वळसे पाटील यांच्याकडील कामगर खाते हसन मुश्रीफ यांना तर उत्पादन शुल्क खाते हे अजित पवार यांना देण्यात आले आहे .