November 27, 2021

जिल्ह्यातील सर्व दुकाने उद्यापासून बंद !जिल्हा प्रशासनाचा झोपेत धोंडा !

जिल्ह्यातील सर्व दुकाने उद्यापासून बंद !जिल्हा प्रशासनाचा झोपेत धोंडा !

बीड – 26 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात लॉक डाऊन लावल्यानंतर आता राज्य शासनाचा 30 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन चा फतवा आल्याने जिल्हा प्रशासनाने त्याप्रमाणे आदेश काढत उद्यापासून मेडिकल,किराणा,भाजीपाला वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देत या व्यापाऱ्यांवर फाशी घेण्याची वेळ आणली आहे .तब्बल 25 दिवस बाकी सगळे दुकाने बंद ठेवायची म्हणल्यावर याला लॉक डाऊन नाही म्हणायचं तर काय म्हणायचं अन मग हातावर पोट असणाऱ्यांनी जगायचं कस असा सवाल केला जात आहे .

बीड जिल्ह्यात तब्बल दहा दिवसाचा लॉक डाऊन लावण्यात आला,30 मार्च नंतर काहीसा कमी केला गेला,मात्र त्यानंतर 4 एप्रिल रोजी राज्य शासनाने जे आदेश दिले त्यानंतरही जिल्हा प्रशासनाने नवे आदेश न काढता जिल्ह्याचा लॉक डाऊन हटवला जात असल्याचे सांगितले, त्यामुळे बीड जिल्ह्याला राज्याच्या लॉक डाऊन मधून वगळले म्हणून व्यापारी,सामान्य माणूस खुश होता .

ही ऑर्डर जिथं गोल केलं आहे ते नीट वाचा अन ठरवा याचा अर्थ काय ?

पण अवघ्या बारा तासात जिल्हा प्रशासनाने आपला खरा रंग दाखवला आहे,सायंकाळी सात वाजता नवे आदेश काढत प्रशासनाने शनिवार रविवारी संपूर्ण लॉक डाऊन आणि सोमवार ते शुक्रवारी अत्यावश्यक सेवा ज्यात किराणा मेडिकल, भाजीपाला,दूध वगळता इतर दुकाने संपूर्णपणे बंद राहतील,या काळात वैध कारणाशिवाय नागरिकांना बाहेर पडता येणार नाही म्हणत प्रशासनाने सगळ्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना धक्का दिला आहे .

जर 4 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सगळ्यांनी लॉक डाऊन चे पालन केले असेल तर राज्याच्या लॉक डाऊन मधून सूट मिळणे अपेक्षित होते .पण तसे न करता जिल्हा प्रशासनाने वरचे आदेश कायम करत उद्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही दुकाने उघडता येणार नाहीत अस म्हटलं आहे .

या नव्या आदेशामुळे बीड सारख्या मागास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हातावर पोट असणारे लोक,छोटे व्यापारी ज्यात चष्मा दुकानदार,कॉम्प्युटर,इलेक्ट्रॉनिक,इलेक्ट्रिक,इस्त्री,पार्लर,सलून,हार्डवेअर, कपडा,सिमेंट,स्टील,फर्निचर यासह इतर दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत .

एवढंच नाही तर उद्यापासून बार,रेस्टॉरंट, हॉटेल,खानावळी येथे केवळ पार्सल सुविधा सुरू राहील ,कोणालाही या ठिकाणी कोणालाही बसून जेवण करता येणार नाही .हा सगळा प्रकार म्हणजे झोपेत धोंडा घालण्याचा आहे,यामुळे सामान्य माणसाच्या हाताचे काम बंद पडणार असून त्याने जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *