मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्ब नंतर हाय कोर्टात गेलेल्या परमवीर सिंग आणि जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे .अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली .
मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांनी वाझे आणि इतर अधिकाऱ्यांना महिन्याला शंभर कोटी रुपये वसुली चे टार्गेट दिले होते असे पत्र जाहीर केले होते
यामुळे अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे .याबाबतची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली .