बीड – जिल्हा प्रशासनाने 26 मार्च पासून लावलेला लॉक डाऊन आज रात्रीपासून शिथिल करण्यात आला आहे,मात्र दहावी बारावी चे क्लास आणि शाळा वगळता इतर शाळा बंदच राहतील,तसेच राज्य शासनाने लागू केलेले नियम कायम राहतील असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत .




बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यात लावण्यात आलेला लॉक डाऊन शिथिल करण्याबाबत आदेश काढले,यात मास्क चा वापर ,सोशल डिस्टनसिग, यावर भर देण्यात आला आहे .सार्वजनिक ठिकाणी दारू,पण,गुटखा विक्रीला बंदी घालण्यात आली आहे .
विवाह समारंभास केवळ पन्नास व्यक्ती ज्यांची अँटिजेंन किंवा आरटीपीसीआर केली आहे त्यांना परवानगी असेल तर अंत्यसंस्कार साठी 20 लोकांना परवानगी असणार आहे .वर्क फ्रॉम होम सोबतच तापमान मोजल्याशिवाय आणि मास्क असल्याशिवाय दुकानात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही .
वैद्यनाथ मंदिर आणि योगेश्वरी मंदिर हे सकाळी सात ते बारा या वेळेत सोशल डिस्टन्स पाळून दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे .त्याच बरोबर दहावी आणि बारावीचे क्लास पन्नास टक्के मर्यादेत सुरू राहतील,सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत सुरू राहतील,रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु सुरू राहील असेही आदेशात म्हटले आहे .