बीड – जिल्ह्यातील बीड,अंबाजोगाई आणि आष्टी तालुक्यात रुग्णवाढीची रेस लागली असून बीड आणि अंबाजोगाई ने शतक कायम राखले असताना आष्टीने देखील फिफ्टी केली आहे .जिल्ह्याने शनिवारच्या आकड्याला मागे टाकत वाढ नोंदवली आणि तब्बल 486 चा स्कोर केला .






बीड जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून कोरोना बाधितांचा आकडा दोनशे पासून ते पाचशेच्या घरात गेला आहे .प्रशासनाने यावर कंट्रोल यावा म्हणून लॉक डाऊन चा पर्याय निवडला मात्र या थर्ड अंपायरला न जुमानता कोरोनाने आपली जोरदार बॅटिंग सुरूच ठेवली आहे .
बीड जिल्ह्यात गेल्या महिनाभरात रुग्णवाढीचा वेग बघता आकडे चक्रावून टाकणारे आहेत .रविवारी तब्बल 2959 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 486 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
रविवारच्या अहवालात वडवणी 9,शिरूर 15,पाटोदा 26,परळी 43,माजलगाव 37,केज 34,गेवराई 30,धारूर 8,बीड 120,आष्टी 57 आणि अंबाजोगाई मध्ये तब्बल 107 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत .