April 13, 2021

मे पर्यंत रुग्णसंख्या वाढतच राहणार !

मे पर्यंत रुग्णसंख्या वाढतच राहणार !

बीड – देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात गेल्या महिना दोन महिन्यांपासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा मे अखेरीस कमी होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे .याच लोकांनी पहिल्या लाटेबाबत केलेला अंदाज खरा ठरला होता,त्यामुळे लोकहो अजुन महिनाभर कळ काढा हे नक्की .

सध्याचं कोरोना संसर्गाचं प्रमाण एप्रिलपर्यंत शिखरावस्था गाठेल.
एप्रिल मध्यापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहील.
त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल.
मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना रुग्ण कमी होतील, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केलंय.तर स्वतंत्र गणिती आकडेमोडीनुसार, हरियाणाच्या अशोक विद्यापीठाचे गौतम मेनन यांनीही दुस-या लाटेची शिखरावस्था ही एप्रिल मध्य आणि मे मध्य यांच्या दरम्यान राहील असा अंदाज वर्तवलाय.

मात्र हे केवळ गणितीय अंदाज आहेत. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 45 हजारांवर पोहोचलीय.कोरोना रुग्ण याच वेगानं वाढत राहिले आणि आपण सगळ्यांनी पुरेशी काळजी घेतली नाही तर हे अंदाज देखील चुकीचे ठरू शकतात.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *