March 22, 2023

श्रेय कोणाला घ्यायचे त्यांनी घ्या पण काम क्वालिटी च करा !

श्रेय कोणाला घ्यायचे त्यांनी घ्या पण काम क्वालिटी च करा !

बीड – देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याला रस्त्यासाठी अडीच हजार कोटींच्या आसपास निधी दिला अन बीड जिल्ह्यात श्रेय वादाची लढाई सुरू झाली .परळीत पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खा प्रीतम मुंडे यांनी दावे केले तर बीडमध्ये माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर आणि आ संदिप क्षीरसागर यांनी दावे केले .कोणामुळे निधी आला हे महत्वाचे नाही,मात्र काम करताना गुत्तेदार पोसण्याऐवजी रस्ते दर्जेदार कसे होतील याकडे लक्ष द्यावे अशी जनतेची अपेक्षा आहे .

बीड नगर पालिके अंतर्गत जी काही विकास कामे केली जातात त्यावर कधीच साधा ज्युनियर इंजिनिअर देखील जात नाही,कारण कामच तेवढा मोठा माणूस (गुत्तेदार) करीत असतो मग तिथं जाऊन मेहनत घेऊन शासनाचा पगार घ्यायचा कशाला त्यापेक्षा बसल्या जागेवर शासनाचा पगार अन गुत्तेदरकडून टक्केवारी मिळत असेल तर बरच आहे ना.त्यामुळे बीड शहरात जी कामे सुरू आहेत त्यावर कोणीही नगर पालिकेचा शिपाई देखील कधी गेलेला दिसला नाही .

समजा जर नगराध्यक्ष यांना वाटलं तर ते एक चक्कर मारतात,त्यावेळी शहरातील सगळे चमको गिरी करणारे आणि सीओ पासून रोजंदारीवर लागून उपअभियंता म्हणून काम पाहणारे सगळे लोक जी हुजुरी करण्यात मग्न असतात .बर त्यावेळी जो कोणी मोठा गुत्तेदार (पार्टनर) आहे तो तिथं नसतोच,तो पुण्यात किंवा घरी बसून कारभार हाकत असतो,हे लोक येतात चक्कर मारतात,चार दोन फोटो काढतात अन निघून जातात .

असाच प्रकार विद्यमान आमदार यांच्याबाबत देखील आहे,मतदारसंघात मोठी काम आणल्याचा दावा ते करत असले तरी एखाद्या कामावर दोन चार तास थांबून दर्जा तपासायला त्यांना वेळच नाही .ते सगळंच गुत्त लाडक्या बाबू कडे दिलेलं आहे,तो नसेल तर मग पंचायत समितीत वचवच करणारा गाय k असो यांच्यावर आहे,पण जर आमदार भावाला व्यस्ततेमुळे वेळ नसेल तर उपनगराध्यक्ष म्हणून बसलेल्या लहान भावाने लक्ष द्यावे ना,पण ते त्यांच्याच कामात व्यस्त असतात .मग कामाचा दर्जा बघणार कोण .

अशीच काहीशी अवस्था परळी मतदारसंघात देखील आहे .राज्याचे सामाजिक न्यायमंत्री म्हणून धनंजय मुंडे हे दृष्ट लागण्याजोग काम करीत आहेत मात्र जिल्ह्यातील कारभार पंढरी वरून कोण हाकत,कोणत्या अण्णा च दर्शन झाल्याशिवाय काम होत नाही हे सगळ्यांना माहीत आहे,त्यांना सर्वाधिकार आहेत पण त्यांनाही आता पीए ची गरज असल्यासारखी स्थिती आहे .

बर दुसरीकडे खासदार असणाऱ्या प्रीतम मुंडे या वाऱ्यासारख्या केव्हा येतात जिल्ह्यात अन केव्हा जातात हे त्यांच्याच कार्यकर्त्यांना कळत नाही,मग कामावर त्या कधी जाऊन थांबून पाहणी करणार.त्यांच्या आजूबाजूला असलेले पहिल्यापासून हवेतच आहेत त्यामुळे ताईसाहेब आल्या की समोर यायचं अन गेल्या की गायब व्हायचं अशी स्थिती आहे .

नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला .अन बीड जिल्ह्यातील नेत्यांत श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली .श्रेय घ्यायला हरकत कोणाचीच नाही,पण आपण एवढी मेहनत करून जर निधी आणला तर त्याची विल्हेवाट कशी लागते हे बघणाऱ्या यंत्रणेवर अंकुश ठेवण्याच काम कोणाचं आहे .का बरं पालकमंत्री किंवा खासदार,आमदार,माजी आमदार हे कामावर वर्षातून दहा पाच वेळा भेट देत नाहीत,परळी अंबाजोगाई चा ऐतिहासिक रस्ता असो की बीड शहरातून जाणारा महामार्ग असो कितीदा प्रत्यक्ष कामावर जाऊन या लोकप्रतिनिधी नि पाहणी केली .

तुम्ही जर करोडो रुपये आणतात ना तर दर महिन्यातून किमान एकदा दोनदा भेट द्या ना,काम निकृष्ट होत असेल तर ते करण्याची हिंमत तुम्ही कधीही भेट देऊ शकता या भीतीमुळे कोणी करणार नाही .पण हे करण्याऐवजी निधी आणल्याचा डंका पिटण्यातच सगळे समाधान मानतात .

बीड शहराच्या अनेक कॉलनीत सिमेंट रस्ते तयार होत आहेत ज्याची थीकनेस सहा इंच असावी अशी अट निविदेत आहे मात्र लाडक्या गुत्तेदार मंडळींनी तीन इंचाचा रस्ता करून बिल उचलली,मग वर्षभरात त्यावर खड्डे पडतात अन लोक नेत्यांच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहतात .हेच जर त्या रस्त्याच्या कामावर लोकप्रतिनिधी दोन तीन वेळा गेले तर तो सहा इंचाचा रस्ता करेल मात्र अस होताना दिसून येत नाही .

एकंदर काय तर अंगणवाडी च बांधकाम असो की महामार्ग अथवा इमारत बांधकाम प्रत्येक ठिकाणी नेत्यांनी जर भेट दिली,पाहणी केली तर अधिकारी सुतासारखे सरळ वागतील अन गुत्तेदार धड काम करतील .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click