गेवराई – दुचाकी आणि ट्रक च्या अपघातात एक जण ठार आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गेवराई औरंगाबाद महामार्गावर घडली,या घटनेत जखमीचे प्राण वाचविण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या प्रयत्नाचे कौतुक होत आहे .
शहरातून बागपिंपळगावंकडे जाणाऱ्या दुचाकीला बायपास जवळील रस्त्यावर समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने १ जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. शिवाजी फुलारे असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून बाबासाहेब मुकुटराव असे जखमीचे नाव आहे.
बागंपिंपळगाव येथील रहिवासी शिवाजी फुलारे आणि बाबासाहेब मुकुटराव हे गेवराई येथे काही कामानिमित्त दुचाकीवरून आले होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास ते दुचाकीवरून बागपिंपळगावकडे परतत होते. यावेळी बायपास जवळ समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने ( क्रमांक जी.जे 01 सी.वाय 5475 ) त्यांना जोराची धडक दिली. यात शिवाजी फुलारे हे जागीच ठार झाले