बीड – तीन हजार रुग्णांची तपासणी केल्यानंतर आतापर्यंत तीनशे सव्वातीनशे,पावणे चारशे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या बीड जिल्ह्यात गेल्या दोन चार महिन्यातील रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या शनिवारी आढळून आली,तब्बल 434 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .यात बीड,अंबाजोगाई, आष्टी,माजलगाव तालुक्यातील आकडे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे .






जिल्ह्यातील वडवणी 6, शिरूर 12,पाटोदा 23,परळी 54,माजलगाव 30,केज 22,गेवराई 13,धारूर 4,बीड 965,आष्टी 60 आणि अंबाजोगाई मध्ये 112 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेले रिपोर्ट हे लोकांची बेफिकिरी समोर आणणारे आहेत .हे असंच सुरू राहील तर येणाऱ्या काळात जिल्ह्यातील लोकांना शासकीयच काय पण खाजगी रुग्णालयात देखील बेड मिळणे अवघड होईल,त्यामुळे आतातरी नियम पाळणे गरजेचे आहे .