मुंबई – राज्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे ते रोखण्यासाठी सरकार सक्षम आहे मात्र लोक सहकार्य करणार नसतील तर नाईलाजाने येत्या दोन दिवसानंतर लॉक डाऊन चा निर्णय घ्यावा लागेल तेव्हा जबाबदारीने वागा अन कोरोनाला रोखा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं .
जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात गेल्या वर्षभरात आरोग्य सुविधेमध्ये केली गेलेली वाढ,बेडची संख्या,ऑक्सिजन ची संख्या याबाबत सविस्तर माहिती दिली .विरोधक या संकट काळात देखील शिमगा करत असल्याचा टोला लगावत लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर सुद्धा कोरोना होऊ शकतो त्यामुळे नियम पाळा असे आवाहन केले .
राज्यात अनेकजण लॉक डाऊन ला विरोध करत आहेत मात्र यावर राजकारण न करता लोकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करा,त्यासाठी रस्त्यावर या अस सांगत ठाकरे यांनी राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत टेस्टची काढलेली संख्या,लसीकरणाची वाढलेली परिस्थिती याबाबत माहिती दिली .
उद्धव ठाकरे यांनी येत्या काळात सर्व हॉस्पिटल हाऊसफुल होतील त्यामुळे यंत्रणेवर ताण येईल अस वागू नका,मास्क वापरा,सोशल डिस्टन्स पाळा अस आवाहन करत देशासह विदेशात काय परिस्थिती आहे याची माहिती दिली .
कोरोनाला हरवायच आहे मात्र टाळी एका हाताने वाजत नाही त्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे अस सांगून दोन दिवसात विविध तज्ज्ञांशी बोलून परिस्थिती न सुधारल्यास लॉक डाऊन चा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा दिला .