May 28, 2022

शरद पवार रुग्णलायत दाखल !

शरद पवार रुग्णलायत दाखल !

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोट दुखीचा त्रास होत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली होती. बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. परंतु, प्रकृती बिघडल्यामुळे शरद पवार यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली होती. उद्या बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे पण पवार यांना अचानक आज त्रास होत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.’

शरद पवार यांना पित्ताशयात खडे झाले आहेत. त्यांच्यावर बुधवारी 31 मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

पित्ताशय हा पोटाच्या उजव्या बाजूला यकृताच्या खाली असलेला एक पिशवीसारखा अवयव. यकृताद्वारे तयार झालेलं पित्त साठवणं आणि घट्ट करणं हे पित्ताशयाचं काम. पचनासाठी या पित्ताची मदत होते. पित्ताशय हा पोटाच्या उजव्या बाजूला यकृताच्या खाली असलेला एक पिशवीसारखा अवयव. यकृताद्वारे तयार झालेलं पित्त साठवणं आणि घट्ट करणं हे पित्ताशयाचं काम. पचनासाठी या पित्ताची मदत होते.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click