माजलगाव – वाळू माफियांकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड याच्यावर शासनाने महिन्यानंतर निलंबनाची कारवाई केली आहे .
माजलगाव येथे उपजिल्हाधिकारी असणाऱ्या श्रीकांत गायकवाड याने वाळू ची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तब्बल एक लाख रुपये लाच स्वीकारली होती .या कारवाईने मोठी खळबळ उडाली होती .
गायकवाड याला अटक होण्याच्या एक दिवस अगोदरच त्याचा मित्र बीडचा बीडीओ मिसाळ यालादेखील लाच घेताना रंगेहाथ पडकले होते .दरम्यान त्यांच्या अटकेनंतर शासनाने महिनाभराच्या कालावधी नंतर गायकवाड याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे .