मुंबई – कोरोनाचा आकडा रोज 25 ते 30 हजाराच्या पुढे सरकत असताना लोक निष्काळजीपणा करत आहेत,त्यामुळे सरकार अन प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत,आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे म्हणूनच नाईलाजास्तव लॉक डाऊन करावे लागण्याची भीती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे,त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत .त्यामुळे येत्या एक दोन दिवसात राज्य लॉक डाऊन होण्याची शक्यता आहे .
मत्रालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण बंदी घालीव तसेच खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येने निर्बंध पाळत नसतील तर लाॅकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडताहेत. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित टास्कफोर्सची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाॅकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना दिल्या आहेत.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डाॅक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.