November 27, 2021

भारताचा इंग्लंड वर विजय !

भारताचा इंग्लंड वर विजय !

पुणे – भारत आणि इंग्लंड मध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने सात धावांनि विजय मिळवत मालिका दोनेक ने खिशात घालत टेस्ट,टी ट्वेन्टी आणि एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला .

येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ३२९ धावा ठोकल्या. भारतीय डावात यष्टीरक्षक रिषभ पंतने आक्रमक अर्धशतक झळकावले. मात्र, त्याला बाद करताना इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने अप्रतिम झेल टिपला. त्याच्या या झेलाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

रिषभची तुफानी खेळी
अखेरच्या निर्णायक सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने यष्टीरक्षक रिषभ पंतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. त्याने पुन्हा एकदा नैसर्गिक फटकेबाजीचा नजराणा सादर करत ६२ चेंडूत ५ चौकार व ४ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च ७८ धावा ठोकल्या.

रिषभ पंत आपल्या पहिल्यावहिल्या वनडे शतकाकडे वेगाने आगेकूच करत होता. डावाच्या ३५ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर गोलंदाज सॅम करनने खोल टप्प्याचा चेंडू टाकला. पंतने हा चेंडू लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटची कड घेऊन यष्ट्यांमागे गेला.

इंग्लंडचा यष्टीरक्षक आणि कर्णधार जोस बटलर हा पहिल्यांदा जरासा उजव्या हाताकडे झुकला होता. परंतु, चेंडू डाव्या हाताकडे अत्यंत खालच्या दिशेने आला. त्याने चपळाइने हात मध्ये घालत हा झेल पकडला. पंत लवकर बाद झाल्याने भारतीय संघाने ३०-४० धावा कमी बनविल्या.

इंग्लंड चा डाव सॅम करन च्या 95 धावांमुळे रंगात आला होता,पण नटराजन च्या शेवटच्या शटकात 15 धावा करता न आल्याने पराभव पत्करावा लागला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *