April 13, 2021

राऊत यांच्या रोखठोक ला अजित दादांचे कडक उत्तर !

राऊत यांच्या रोखठोक ला अजित दादांचे कडक उत्तर !

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रोखठोक मुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले असून महाविकास आघाडीमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याच काम करू नये,अशी वक्तव्य टाळली पाहिजेत अशा शब्दात पवार यांनी राऊत यांचे कान टोचले आहेत .

महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करु नये,’ अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांना इशारा दिला आहे. अनिल देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रीपद दिल्याचे विधान संजय राऊत यांनी केल्यानंतर आज बारामतीत अजित पवार यांना पत्रकारांनी या बाबत विचारणा केली. त्यानंतर अजित पवार यांनी रोखठोक शैलीत राऊत यांना इशारा दिला आहे.

कॉंग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना, शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना तर राष्ट्रवादीत शरद पवार यांना कोणाला मंत्री करायचे याचा अधिकार आहे, त्यामुळे ते या बाबतचा निर्णय घेत असतात. महाविकास आघाडीबद्दल त्रयस्थाने वक्तव्य करणे समजू शकतो, पण घटक असलेल्यांनी अशी विधाने करणे योग्य नाही, अशा शब्दात पवार यांनी या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *