नवी दिल्ली – एकीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्य सरकारवर चौफेर हल्ला चढवत असताना अन त्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद स्पष्टपणे दिसत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपनेते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे,दरम्यान सगळं काही सांगायचं नसत अस म्हणत शहा यांनी सस्पेन्स आणखीनच वाढवला आहे .
अमित शहा आज दिल्लीत दाखल झाले असून त्यांना पत्रकारांनी शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता, ‘सर्वकाही जाहीर करण्यासारखे नसते, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. शहा यांचे वक्तव्य शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट झाल्याचेच स्पष्ट करते. शहा आणि पवार यांच्या भेटीबाबत एका गुजराती वृत्तपत्रात बातमी येताच महाराष्ट्राच्या राजकीय पटलात उत्सुकता लागली होती. या बातमीचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी इन्कार केला होता. मात्र, शहा यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीचे भवितव्य काय असेल याबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत.
दरम्यान या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी इन्कार केला आहे मात्र शहा यांच्या सूचक वक्तव्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेची हवा टाईट झाली आहे .