April 12, 2021

शिरूर, रायमोह रुग्णालयाला भरीव निधी !

शिरूर, रायमोह रुग्णालयाला भरीव निधी !

बीड – जिल्ह्यातील शिरूर आणि रायमोह येथे रुग्णालय इमारत उभारणीसाठी निविदा प्रसिद्ध झाल्या असून पालकमंत्री धनंजय मुंडे, आ संदिप क्षीरसागर, आ आजबे यांच्या प्रयत्नाला यश आल्याचा दावा एकीकडे केला जात असताना दुसरीकडे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यामुळेच हा निधी अन कामाला मंजुरी मिळाल्याचा दावा क्षीरसागर यांच्यावतीने केला जात आहे .काम कोणामुळे झाले यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आला हे महत्वाचे असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहेत .

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील ग्रामीण रुग्णालयास पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून ३० खाटांच्या रुग्णालय इमारतीच्या बांधकामास निधी उपलब्ध झाला असून, या बांधकामाची ११.०२ कोटी रुपयांची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने आज प्रसिद्ध केली आहे. आ. बाळासाहेब आजबे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यासाठी ना. मुंडेंकडे मागणी केली होती.

त्याचबरोबर शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी ९.०६ कोटी रुपयांची निविदा देखील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रुग्णालयाच्या बांधकामासाठी आ. आजबे यांच्यासह आ. संदीप क्षीरसागर यांनीही पालक मंत्री महोदयांकडे मागणी केली होती.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी अर्थ व नियोजन विभागामार्फत लावण्यात आलेले आर्थिक निर्बंध काही प्रमाणात शिथिल होताच जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह विविध विकास कामांवर जोर दिला आहे.

शिरूर कासार येथे ३० खाटांची क्षमता असलेले रुग्णालय बांधणे त्याचबरोबर मोठी लोकसंख्या असलेल्या रायमोहा येथे ग्रामीण रुग्णालय उभारणे याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती.

दरम्यान माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यामार्फत देखील या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचा अन त्यामुळेच मोठा निधी मंजूर झाल्याचा दावा केला गेला आहे .

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *