औरंगाबाद – कोरोना बाधितांचा वाढता आकडा आणि बेफिकीर नागरिक यामुळे अखेर जिल्हा प्रशासनाने मंगळवार पासून संपूर्ण औरंगाबाद लॉक डाऊन चा निर्णय घेतला आहे .प्रशासनांच्या या निर्णयाची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली .रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येतील अन नागरिकांनी सहकार्य न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा ईशारा चव्हाण यांनी दिला आहे .बीड ,नांदेड पाठोपाठ आता औरंगाबाद देखील लॉक डाऊन झाल्याने कोरोना मराठवाड्यात धुमाकूळ घालतोय हे स्पष्ट झाले आहे .
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढत होत आहे. या पार्श्वभूमिवर औरंगाबाद शहरात येत्या 30 मार्च पासून 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली आहे.
करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला असून, लॉकडाऊनच्या काळात किराणा दुकाने, दूध, भाजी देखील दुपारी 12 पर्यंतच उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर सर्व गोष्टी बंद केल्या जातील. दरम्यान, या काळात अत्यावश्यक सेवा आणि उद्योग सुरू राहतील. याशिवाय, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.