बीड – जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी तीनशे पार गेला .शनिवारी तब्बल 375 रुग्ण आढळून आले आहेत .2713 रुग्णांची तपासणी केली असता यात पॉझिटिव्ह चा आकडा वाढलेला दिसत आहे .





बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा लॉक डाऊन केल्यानंतर देखील जोरात वाढत असल्याचे चित्र आहे .जिल्ह्यातील सर्व सीसीसी सेंटर हाऊसफुल होण्याच्या मार्गावर असून आणखी काही सीसीसी सेंटर सुरू करण्याचा विचार आरोग्य विभाग करत आहे .
जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात वडवणी 5,शिरूर 4,पाटोदा 23,परळी 38,माजलगाव 25,केज 27,गेवराई 24,धारूर 12,बीड 112,आष्टी 30 आणि अंबाजोगाई मध्ये 75 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .