बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शुक्रवारी तब्बल चारशेच्या घरात गेला गेला,2600 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 383 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .यामध्ये अंबाजोगाई मध्ये 100 आणि बीड तालुक्यात 119 रुग्ण आढळून आले आहेत .विशेष म्हणजे यामध्ये तब्बल बारा कर्मचारी हे एसपी ऑफिसमधील आहेत,त्यामुळे एसपी ऑफिसमध्ये प्रवेश करताना आता कडक नियम पाळावे लागणार आहेत .





बीड जिल्ह्यात शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात वडवणी 6,पाटोदा 9,परळी 33,माजलगाव 27,केज 28,गेवराई 21,धारूर 10, बीड 119,आष्टी 30,आणि अंबाजोगाई मध्ये 100 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असून शुक्रवारी प्राप्त अहवालात एसपी ऑफिसमधील तब्बल 12 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे .त्यामुळे यापुढे एसपी ऑफिसमध्ये प्रवेश करण्यासाठी यापुढे कडक नियम पाळावे लागणार आहेत .