November 27, 2021

रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू !

रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू !

मुंबई – भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग तब्बल 11 तासांनी आटोक्यात आली आहे. या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे. मात्र ही आग नेमकी कशी लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही

या मॉलमध्ये सनराईस रुग्णालय चालवले जात होते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती मॉलमधील रुग्णालयात पसरली. या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

भांडूपमधील अग्नितांडवात 61 जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले होते. तर चार जणांचा शोध सुरु आहे. या मॉलच्या चारही बाजूला आग पसरल्याने अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत होता. तब्बल 11 तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सध्या या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *