नवी दिल्ली – कोणत्याही परिस्थितीत राज्यव्यापी लॉक डाऊन लावता येणार नाही अस सांगत केंद्र सरकारने नवे नियम घालून दिले आहेत .यामध्ये कॅन्टोन्मेंट झोन वगळता सर्व ठिकाणी शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट, बार,पब,मेट्रो,रेल्वे,चित्रपट गृह,क्रीडांगण सुरू राहतील असे आदेशात म्हंटले आहे .मात्र हे असताना जिल्हा पातळीवर निर्बंध लावण्याचे अधिकार प्रशासनाला दिले आहेत .
केंद्राने आपल्या नव्या निर्देशानुसार जिल्हा,उपजिल्हा आणि शहर प्रभाग स्तरावर असे निर्बंध लादले जाऊ शकतात.
राज्यव्यापी लॉकडाऊन करता येणार नाही.या परिस्थितीत लॉकडाउन तसेच व्यक्ती आणि वस्तूंच्या आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत हालचालींवर कोणतीही बंदी असणार नाही नवीन कोरोना रुग्ण सापडल्यास त्यावर वेळेवर आणि त्वरित इलाज केला जावा. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या. चाचणी, ट्रेसिंग आणि उपचार यांच्यावर भर देऊन प्रोटोकॉल सक्तीने लागू करण्याचे आदेश
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या मदतीने संपर्कात आलेल्या सगळ्या व्यक्तिंचे विलगीकरण केले जावे. कंटेन्मेंट झोनची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी कलेक्टर वेबसाईटवर द्यावी. तसेच ही यादी केंद्रीय आरोग्य मंत्रालयालाही द्यावीआरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण विहित 70 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात यावे
राज्यांना मागील वर्षीप्रमाणे कंटेन्मेंट झोनचे सीमांकन करतानाच प्रकरणांचा मागोव घ्या, तसेच उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करा.तसेच, कंटेन्मेंट झोन वगळता सार्वजनिक गोष्टींना अनुमती असेल. यात प्रवासी रेल्वेगाड्या, विमान वाहतूक, मेट्रो, शाळा, उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था, हॉटेल्स, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल्स, चित्रपटगृहे, मनोरंजनाची ठिकाणे, योगा सेंटर, प्रदर्शनं खुली राहतील.