परळी – अट्रोसिटी ची तक्रार मागे घेण्यासाठी तसेच कँटीन चालवण्याची परवानगी मिळावी म्हणून एक लाख रुपयांची लाच घेताना रेल्वे च्या सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना जेरबंद करण्यात आले .पकडण्यात आलेली व्यक्ती ही महिला असल्याने खळबळ उडाली आहे .
माधुरी मुंढे,संजय मेंढेकर आणि प्रेमदास पवार या तिघांनी तक्रादारकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती .याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या तिघांना रंगेहाथ पकडले .
सपोनि मुंढे यांच्या अटकेने खळबळ उडाली आहे .रेल्वे पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे .या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .