December 10, 2022

खटोड ,मौजकर यांचा बीडमध्ये अनोखा मुळशी पॅटर्न ! दुसरा गुन्हा दाखल !!

खटोड ,मौजकर यांचा बीडमध्ये अनोखा मुळशी पॅटर्न ! दुसरा गुन्हा दाखल !!

बीड – तलवारी,बंदूक याच्या जोरावर गुंड पुंडाना हाताशी धरून गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी अधिकाऱ्यांच्या मदतीने बळकावयच्या आणि कोट्यवधी रुपये कमवायचे असा मुळशी पॅटर्न बीड मध्ये लँड माफिया गौतम खटोड आणि प्रवीण जैन (मौजकर ) यांनी राबवला आहे .अवघ्या तीन आठवड्यात या दोघांवर जमीन बळकावली म्हणून गुन्हा दाखल झाला आहे .आता पोलिसांनी या माफियांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे .

सहा एकर जमीन बळकावली: गौतम खटोडसह पाच जणांवर गुन्हा दाखल
बीड/प्रतिनिधी: बनावट कागदपत्रे तयार करुन जमीन बळकावल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील पारगाव जप्ती येथील एका शेतकऱ्याच्या दोन हेक्टर ४३ आर एकर जमिनीवर बनावट दस्ताऐवजाद्वारे कब्जा करुन फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गौतम खटोडसह पाच जणांवर बीड ग्रामीण ठाण्यात मंगळवारी (दि.२३) गुन्हा नोंद झाला.


पोलिसांच्या माहितीनुसार, पारगाव (जप्ती) येथील अनंत कडाजी तिपाले (५०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, पारगाव (जप्ती) येथील गट क्र.६२ मध्ये त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. ७ मे १९८५ रोजी त्यांनी चुलत्याकडून १९ एकर पैकी १० एकर चार गुंठे जमीन खरेदी केली होती. खरेदी खतामध्ये दक्षिणेकडील जमीन खरेदी करत असल्याची नोंद आहे. सातबारा उताऱ्यावर तसे नमूद आहे. दरम्यान, चुलते मयत झाल्यानंतर गट क्र६२ मधील ९ एकर जमीन चुलतभावाने विक्री केली. त्यानंतर खरेदीदाराने २ एप्रिल १९९३ रोजी दोन एकर ४३ आर जमीन झुंबरलाल पन्नालाल खटोड यांना विक्री केली होती.

दरम्यान, झुंबरलाल खटोड यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र गौतम झुंबरलाल खटोड यांनी मूळ खरेदीदारांशी संगणमत करुन बनावट चर्तु:सीमा व खरेदीखत तयार करुन दुरुस्तीपत्र केले व फसवणूक केली. यासंदर्भात अनंत तिपाले यांच्या फिर्यादवरुन गौतम झुंबरलाल खटोड, रतनलाल पन्नालाल नहार व इतर तिघांवर बीड ग्रामीण ठाण्यात फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला. सहायक निरीक्षक योगेश उबाळे तपास करत आहेत.


तीन आठवड्यात दुसरा गुन्हा
बनावट कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांच्या फिर्यादीवरुन शहर ठाण्यात पाच जणांवर गुन्हा नोंद झाला होता. मंगळवारी बीड ग्रामीण ठाण्यातही अशाच स्वरुपाचा गुन्हा नोंद झाला. बीडशहर ठाण्यातील दोन आरोपींचा बीड ग्रामीण ठाण्यातील गुन्ह्यातही समावेश आहे. त्यामुळे भूमाफियांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click