बीड – बीड जिल्ह्यात उद्या रात्रीपासून लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठामार्फत घेण्यात येत असलेल्या पदवी परीक्षा सुरूच राहणार असून विद्यार्थ्यांनी सोबत ओळखपत्र आणि हॉल तिकीट ठेवावे तसेच महाविद्यालयात कोरोना पासून बचाव करण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात असे आदेश विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत .

बीड जिल्ह्यात वाढते रुग्ण पाहता प्रशासनाने 25 मार्च मध्यरात्री पासून कडक लॉक डाऊन घोषित केले आहे .याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता सगळं बंद असणार आहे,तसेच जिल्ह्याच्या सीमा देखील सील करण्यात आल्या आहेत .
दरम्यान गेल्या आठ दिवसापासून विद्यापीठाच्या पदवी परीक्षा सुरू झालेल्या आहेत,यामध्ये लॉक डाऊन घोषित झाल्याने परीक्षेला कस जायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांना होता .याबाबत विद्यापीठ प्रशासनाने एक पत्र सर्व प्राचार्यांना काढले असून यात या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील असे म्हटले आहे .
याबाबत विद्यार्थ्यांना ओळखपत्र आणि हॉल तिकीट सोबत असल्यास कोणतीही अडचण येणार नाही,महाविद्यालयात कोविड बाबत सर्व नियम आणि अटींचे पालन करण्यात यावे असेही आदेशात म्हटले आहे .



जाहिरात

जाहिरात

जाहिरात

IPL SCORE
जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात
