December 6, 2022

प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत व्यापारी दुकान उघडणार नाहीत !

प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत  व्यापारी दुकान उघडणार नाहीत !


बीड – जिल्हा प्रशासनाने लादलेल्या लॉक डाऊन विरोधात जिल्ह्यातील व्यापऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून लॉक डाऊन च्या काळात कोणताही व्यापारी दुकानं न उघडता बेमुदत बंद ठेवनार असल्याचा ईशारा व्यापारी महासंघाने दिला आहे .जर लॉक डाऊन करायचा होता तर व्यापाऱ्यांना विश्वासात का घेतले नाही असा सवाल करत व्यापारी महासंघाने बंदची हाक दिली आहे .प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत एकही दुकान उघडले जाणार नाही असा इशारा दिला आहे .

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात व्यापारी महासंघाणेम्हटले आहे की,आपण बीड जिल्ह्यात दि. 26 मार्च 2021 पासून 10 दिवसाचे लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे.
सध्या कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेता आपण संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन केले आहे. परंतु लॉकडाऊन करत असतांना आपण बाकीच्या गोष्टींचा विचार केला नाही की, व्यापारी या लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडणार आहेत. त्यांचा विचार न करता आपण सरळ लॉकडाऊन करुन मोकळे झालात.
जिल्ह्यात अनेक व्यापारी या गोष्टीमुळे परेशान होणार तर आहेच परंतु आर्थिक अडचणीत देखील सापडणार आहे.


जिल्हा प्रशासन वेळीवेळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना बोलवून बैठक घेते व नागरिकांसाठी गैरसोय होणार नाही यावर चर्चा करते परंतु यावेळेस आपण व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता व चर्चा न करता सरळ लॉकडाऊनचे आदेश काढले ते जाचक व अन्यायकारक आहेत.
आपल्या दालनात बोलाविलेल्या व्यापारी प्रतिनिधीच्या बैठकीत असे ठरले होते की, सर्व व्यापार्‍यांनी अ‍ॅन्टीजेन टेस्ट करावी व सांगितल्याप्रमाणे जवळपास सर्वच व्यापार्‍यांनी आपल्या सुचनांचे पालन केलेले आहे. तरी सुध्दा आपण व्यापार्‍यांची कुठलीच अडचण लक्षात न घेता जो निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे, सर्व व्यापार्‍यांना नियम पाळून व्यापार करण्याची सवलत देण्याचा निर्णय घ्यावा.


आपण आदेशात काही व्यापार्‍यांना व्यवसाय करण्याची अवधी सकाळी 7 ते 9 या वेळेत दिलेली आहे. आपण दिलेली वेळ व्यापारी व ग्राहकांसाठी सोयीची किंवा योग्य आहे का ? आदेश काढतांना कमीत कमी सामान्य नागरिकांचा तरी विचार करावयास पाहिजे होता परंतु या गोष्टीकडे जाणिवपुर्वक दूर्लक्ष करुन प्रशासनाने लॉकडाऊन करुन आपली जबाबदारी व्यापारी व नागरिकांवर सोपवून आपण बिनधास्त झालोत ही मानसिकता याच्यातुन प्रकर्षाने दिसते.


आपण आदेशित केलेले लॉकडाऊन चे आदेश मागे न घेतल्यास आम्ही सर्व व्यापारी संघटना आपण दिलेल्या आदेशाचा निषेध म्हणून संपुर्ण जिल्ह्यात सर्व दुकान, व्यवसाय(आस्थापना) बेमुदत कालावधीसाठी व आपण लॉकडाऊन मध्ये ठरवून दिलेल्या वेळेत उघडणार नाही असे या निवेदनाव्दारे आपणांस कळवित आहोत.
सामान्य नागरिकांच्या गैरसोईस व्यापारी संघटनेचा कुठलाही संबंध राहणार नाही असे आम्ही कळवित आहोत. या संपूर्ण प्रक्रीयेस जिल्हा प्रशासन जबाबदार राहील.


मा. महोदय, आपणांस या निवेदनाव्दारे आम्ही पुढील सर्वश्री. संतोष सोहनी , कार्याध्यक्ष, बीड जिल्हा व्यापारी महासंघ, विनोद पिंगळे, शहराध्यक्ष, व्यापारी महासंघ, मनमोहन कलंत्री, अशोक शेटे, जवाहरलाल कांकरीया, भास्कर गायकवाड, प्रकाश कानगांवकर, विनोद ललवाणी, भास्कर जाधव, राजेंद्र मुनोत, दिपक कर्नावट, मंगेश लोळगे, सुर्यकांत महाजन, जितेंद्र पढदरीया, किशोर शर्मा, सखाराम शेळके, पारस लुनावत, प्रमोद निनाळ, वर्धमान खिंवसरा, मदनलाल अग्रवाल, जितेंद्र लोढा, गोटु संचेती, लईक अहेमद, हरीओम धुप्पड, अनिल गुप्ता, महेश शेटे, राजेंद्र तापडीया, तसेच माजलगाव येथील अध्यक्ष – सुरेंद्र रेदासणी, सुनील भांडेकर, संजय सोळंके, धनराज बंब, अनंत रुद्रवार, संतोष अब्बड, कपिल पगारीया, मेहता, गणेश लोहीया, परळी येथील अध्यक्ष – माऊली फड, नंदुसेठ बियाणी, संदिप लाहोटी, रिकबचंद कांकरीया, सुरेश आगवान, बबलु कच्ची, रमाकांत निर्मळ, पवार, विष्णु देवशेटवार, गेवराई येथील प्रताप खरात, संजय बरगे, अंबाजोगाई येथील ईश्वरप्रसाद लोहीया, दत्तप्रसाद लोहीया, भारत रुद्रवार, श्रीनिवास हराळे, सुभाष बडेरा, रिकबचंद सोळंकी, पाटोदा येथील अजित कांकरीया, बाळू जाधव, सुभाष कांकरीया, कलीमभाई, केज येथील – महादेव सुर्यंवशी, धारुर – अशोक जाधव, वडवणी – विनायक मुळे, आष्टी – संजय मेहेर, शिरुर – प्रकाश देसर्डा व सह संपूर्ण बीड जिल्ह्यातील व्यापार्‍यांचा तिव्र भावना आपल्या समोर मांडलेल्या आहेत आपण या विषयी योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click