बीड – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे,त्यांनी स्वतः ही माहिती ट्विटरवर दिली आहे .
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे,साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी त्यांना मुंबईत कोरोनाची लागण झाली होती,त्यातून बरे होण्यासाठी त्यांनी मुंबईत उपचार घेतले होते,रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सामाजिक आणि राजकीय कामात स्वतःला झोकून दिले होते .
दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी ट्विट करत आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती देत आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी टेस्ट करून घ्यावी असे आवाहन केले आहे .