बीड – प्रशासनाने अनेकवेळा सांगून देखील शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी अँटिजेंन टेस्ट न करता आपली दुकाने सुरू ठेवल्याने अखेर शहरातील काही दुकाने सील करण्यात आली आहेत .कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना व्यापाऱ्यांचा निष्काळजीपणा धोका वाढण्यास कारणीभूत ठरत आहे .
बीड जिल्ह्यात गेल्या महिनाभरात कोरोना बाधितांचा आकडा दररोज दोनशे अडीचशे च्या घरात जात आहे .याला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने व्यापऱ्यांसाठी 15 मार्च पर्यंत अँटिजेंन टेस्ट करून घेण्याबाबत निर्देश दिले होते .
प्रशासनाने अनेक वेळा सांगूनही शेकडो व्यापाऱ्यांनी टेस्ट केलीच नाही .अशा मुजोर आणि नियम न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी काढून प्रशासनाने दिवसभरात अनेक दुकानांना सील केले .प्रशासनाने कडक पाऊल उचलल्याने व्यापऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे .