बीड – जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा आकडा सोमवारी देखील कायम राहिला,सोमवारी प्राप्त अहवालात तब्बल 239 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यात 106 रुग्ण हे बीड तालुक्यातील आहेत हे विशेष .कोरोनाचा आकडा आणि लोकांचा निष्काळजीपणा वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण अधिकच वाढतो आहे .



बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे .यामध्ये वडवणी 2,शिरूर 3 पाटोदा 2,परळी 15,माजलगाव 11,केज 20,गेवराई 10,धारूर 12,बीड 106,आष्टी 15 आणि अंबाजोगाई मध्ये 43 रुग्ण सापडले आहेत .