मुंबई – मुंबईतील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर तपास करणाऱ्या एटीएसने हिरेन यांची हत्याच झाल्याचा दावा केला असून या प्रकरणी विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांच्या मदतीने वाझे यांनीच ही हत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे .
राज्याच्या राजकारणात नव्हे तर देशात खळबळ उडवून देणाऱ्या अंबानी स्फोटक कार प्रकरणात एन आय ए ने ताब्यात घेतलेल्या सचिन वाझे यांची तपासणी सुरू असताना दुसरीकडे एटीएस ने मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे .
एटीएस प्रमुख शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर पोस्ट करून माझ्या आयुष्यातील सर्वात किचकट केस आमच्या टीमने यशस्वीपणे सोडवल्याचा दावा केला आहे .या प्रकरणात मुख्य आरोपी हा वाझेच असून त्याने कुख्यात आरोपी आणि पॅरोल वर बाहेर असलेला विनायक शिंदे आणि नरेश गोर यांच्या मदतीने ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे .
एटीएस ने वाझे यांची कस्टडी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले असून या हत्येचा तपास आता एस आय ए करणार की एटीएस हे लवकरच स्पष्ट होईल .मात्र यामध्ये आणखी कोण कोण आरोपी असतील हे देखील लवकरच उघड होणार आहे .